Sanvad News पलूसकर शिक्षण संकुलात शिक्षक दिन साजरा..

पलूसकर शिक्षण संकुलात शिक्षक दिन साजरा..


भारताचे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून  सर्वञ साजरा करण्यात येत आहे.पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था संकुलात प्रतिमापूजनप्रसंगी मुख्याध्यापक मा. टी.जे. करांडे (सर)सांस्कृतिक विभागप्रमुख ए.के. बामणे (सर), बी.डी. चोपडे, ज्येष्ठ शिक्षक ए.जे.सावंत,बी.एन.पोतदार, सौ. बागल मॅडम,जी.एस.पाटील सर यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते..
यावेळी कोविड काळात महत्त्वाची कामगिरी बजावलेले एस. एन.गस्ते सर व सर्व शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना प्रा. बी.एन.पोतदार सर म्हणाले डॉ राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. काळ आणि परिस्थिती बदलली तरी शिक्षकाची भूमिका मात्र बदललेली नाही. जसा शिक्षक त्याप्रमाणे राष्ट्र निर्माण होते. समाजात शिक्षकाचे स्थान अतिशय आदराचे आहे.व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक हा महत्त्वाचा दुवा असतो. डॉ राधाकृष्णन यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी त्यांनी सांगितल्या. आज शिक्षक म्हणून आपण काय करायला हवे याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन केले..
        भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली  राधाकृष्णन यांचा जन्मदिवस..... समाजाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे शिक्षक येतात की ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला नवीन वळण मिळत जाते. आयुष्याच्या अशा वळणावर ज्या शिक्षकानी आपल्यावर विश्वास दाखवून आपल्या कठीण परिस्थितीत मदत केलेली असते आपल्याला आवश्यक असेल अशा वेळी आपल्यातील आत्मविश्वास जागृत करून यश संपादनासाठी प्रोत्साहित केले असते. शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशा शिक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने एक अभियान राबवण्याचे ठरवले आहे 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त Thank a Teacher   अभियान राबविण्यात येत आहे यानिमित्ताने विद्यालयात निबंध,चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी विविध स्पर्धांचे ऑनलाइन आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक टी.जे. करांडे सर यांनी दिली..
    यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रमुख बी.डी.चोपडे सर यांनी प्रास्ताविक,आभार  सुनील पुदाले सर यांनी मानले..
संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे (साहेब ),उपाध्यक्ष सुनिल रावळ (तात्या ) सचिव जयंतीलाल शहा साहेब ,संचालक विश्वास रावळ सर्व संचालक मंडळ यांनी सर्व शिक्षकांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या..

To Top