Sanvad News सर्वशिक्षा अभियानांतर्गत होणारे ऑडीट स्थगित करा; शिक्षक संघाचे निवेदन

सर्वशिक्षा अभियानांतर्गत होणारे ऑडीट स्थगित करा; शिक्षक संघाचे निवेदन


कारोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षातील शाळांचे अंतर्गत लेखापरीक्षण स्थगित करावे असे निवेदन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सांगली जिल्हा परिषदेच्या लेखाधिका-यांना दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमी वर सदर निवेदन ऑनलाईन सादर केली असल्याची माहिती सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी दिली.
दि.14/8/2020 चे पत्रा अन्वये सर्व शिक्षा अंतर्गत कागदपत्रांची तपासणी तपासणी करून घेणेबाबत कळविण्यात आले होते .परंतु सांगली जिल्ह्यात कोरोना या महामारीने उग्र रुप धारण केले आहे.जिह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना रुग्णाची वाढत आहे.काही शिक्षकानाही याची लागण झाली आहे.या नियोजनाप्रमाणे मुख्याध्यापक व शिक्षक एकत्र येण्याची शक्यता आहे.बरेच मुख्याध्यापक व शिक्षक वय पन्नसीच्या पुढे आहे.काही अनेक आजारांनी त्रस्त आहेत.त्यामुळे कोरोना आजाराच्या संसर्गाचा धोका संभवतो.तरी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तपासणी सद्य परिस्थितीत न घेता दोन महिने पुढें ढकलण्यात यावी. परिस्थिती आटोक्यात आले नंतर शाळांना कल्पना देवून लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
लेखाधिकारी सौ.जमाले मॅडम यांनी सदर निवेदन MPSP पुणे यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.शिक्षणाधिकारी सौ.सुनंदा वाखारे यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे.
To Top