बहुजन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्य सरचिटणीस आकाश तांबे यांनी केले.कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, संलग्न कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने महात्मा फुले स्मृतिदिन व विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिक्षक संघटना राज्य सरचिटणीस आकाश तांबे व राज्य कार्यकारिणी सदस्य गौतम वर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.पाहुण्यांचे स्वागत, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी केले. यावेळी बहुजन शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना कटिबद्ध आहे, विनाअनुदानित शाळांच्या प्रश्नांबाबत कास्ट्राईब सतत शासन दरबारी प्रयत्नशील आहे. ह्या शाळांना शंभर टक्के अनुदान मिळण्यासाठी लढा सुरू आहे. यासाठी सर्व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांनी कास्ट्राईब मध्ये सहभागी व्हावे. तसेच प्राथमिक शिक्षक बॅक निवडणूकीत आरक्षित जागांवर कास्ट्राईब स्वतंत्रपणे उमेदवार उभे करणार आहे. असे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. राज्यात कास्ट्राईब परिवारातील सदस्यांसाठी सहकारी बँक व गृहनिर्माण संस्था निर्माण केली जाणार असल्याचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी सांगितले.
मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत हिवाळी अधिवेशनात राज्यातील एस सी, एसटी आमदारांना पदोन्नतीबाबत प्रश्न मांडण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महासंघाचे वतीने प्रत्येक जिल्ह्यात व आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.