Sanvad News दत्तात्रय डफळे सरांना क्रांतिसूर्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण-खा.राजू शेट्टी

दत्तात्रय डफळे सरांना क्रांतिसूर्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान; समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वपूर्ण-खा.राजू शेट्टी


जिजामाता बालकमंदिर आष्टा ता.वाळवा या विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री.दत्तात्रय डफळे सरांना क्रांतिसूर्य फौंडेशन कोल्हापूर यांच्यावतीने क्रांतिसूर्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान २०२० प्रदान करण्यात आला.

कोल्हापूर येथील मुख्याध्यापक संघाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये आयोजित एका शानदार कार्यक्रमात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खा.राजू शेट्टी व सुप्रसिद्ध सिनेअभिनेते स्वप्निल राजशेखर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र,स्मृतिचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.दत्तात्रय डफळे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून हा पुरस्कार स्विकारला.

यावेळी बोलताना खा.राजू शेट्टी म्हणाले की,समाज घडविण्यात शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे.प्रत्येक व्यक्तीस चांगल्या व आदर्शवत अशा गुरुजनांचा सहवास लागल्याने आदर्श व्यक्तिमत्व घडत आहेत. क्रांतिसूर्य फौंडेशन कोल्हापूर यांनी समाजात चांगले काम करणाऱ्या गुरुजनांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.हा उपक्रम खरोखरचं प्रेरणादायी असा आहे.

यावेळी मनोगतातून अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी सर्व सत्कारमूर्ती मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी


बोलताना दत्तात्रय डफळे सर म्हणाले की,माझी शाळा,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक स्टाफ,विद्यार्थी,पालक,कुटुंबीय यांची मला माझ्या आजवरच्या जीवन प्रवासात साथ लाभली.या यशात त्यांचाही बहुमोल असा वाटा आहे.पुरस्कार माझ्यासाठी दिशादर्शक असून मी नव्या जोमाने शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहीन.

जिजामाता बालक मंदिर आष्टा व सर्व पालक वर्गांच्या वतीने या पुरस्काराबद्दल श्री दत्तात्रय डफळे यांचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष विशाल मोरे,उपाध्यक्ष योगेश वाभाडे,सचिव हर्षदा परीट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर,सत्कारमूर्ती उपस्थित होते.

To Top