महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्ष पदी महेशकुमार श्रीकांत चौगुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी 'साईप्रकाश मंगल कार्यालय जत ' याठिकाणी जत तालुक्यातील सावित्री फातिमांच्या लेकींना प्रदान करण्यात आलेल्या भव्य आणि दिव्य अशा 'सावित्री - फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमात जत विधानसभेचे विद्यमान लोकप्रिय आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते महेशकुमार चौगुले यांचा अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
पलूस येथील महेशकुमार चौगुले हे विद्यार्थी व शिक्षक प्रिय शिक्षक आहे.लोकवर्गणी तसेच स्वतःचे आर्थिक योगदान देवून त्यांनी पलूस मध्ये पहिली डिजिटल क्लासरूम सुरू केली होती.उत्तम संघटन कौशल्य असणारे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ते परिचित आहेत. शिक्षक भारतीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी आपण निरपेक्षपणे लढत राहू असे मनोगत नूतन जिल्हाध्यक्ष महेशकुमार चौगुले यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
यावेळी सौ.आशाताई सुनील पाटील (शिक्षण आणि आरोग्य सभापती सांगली जिल्हा परिषद), श्री. विष्णू चव्हाण(उपसभापती पंचायत समिती जत), श्री.सरदार पाटील( विद्यमान जिल्हा परिषद सदस्य), भुपेंद्र कांबळे(नगरसेवक आणि आरोग्य सभापती नगरपरिषद जत), शिक्षक भारती कोअर कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व जिल्हा पदाधिकारी आणि जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुका पदाधिकारी आणि कार्यकारिणी सावित्री-फातिमा पुरस्कार प्राप्त सत्कारमुर्ती भगिनी उपस्थित होत्या.
या निवडीबद्दल महेशकुमार चौगुले यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.