Sanvad News क्रांतीची धग,आग आणि रग अद्यापही टिकवून ठेवणार्‍या भूमीतील सुपुत्र झाला पदवीधर आमदार .

क्रांतीची धग,आग आणि रग अद्यापही टिकवून ठेवणार्‍या भूमीतील सुपुत्र झाला पदवीधर आमदार .



ज्या कुंडलने गेली शेकडो वर्षे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या अठराशे सत्तावन च्या बंडापासून परकीयांची गुलामगिरी झुगारून देण्यासाठी शेकडो स्वातंत्र्यसैनिक तथा क्रांतीवीर या देशाला दिले. त्याच गावातील सातारच्या प्रतिसरकारच्या लढयाचे सरसेनापती क्रांतीअग्रणी डॉ. जी डी बापू लाड हे स्वातंत्र्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात संयुक्त महाराष्ट्र समिती तर्फे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून 1957 साली प्रथमच महाराष्ट्राच्या विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यानंतरही 1962 साली त्यांना पुन्हा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विधानपरिषदेवर आमदार होण्याची संधी मिळाली होती..आणि आता तब्बल त्रेसष्ट वर्षानंतर बापूंच्या पश्चात त्यांच्याच विचारांचा ,कृतीचा वारसा पुढे चालवणारे त्यांच्या कुटुंबातील त्यांचे जेष्ठ सुपुत्र मा. अरुण (अण्णा )लाड हे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या वरिष्ठ सभागृहात पदवीधरांचे आमदार म्हणून लोकनियुक्त प्रतिनिधी या नात्याने आजच त्यांची आमदार म्हणून प्रचंड बहुमताने निवड झाली त्याबद्दल आण्णाचे खूप खूप अभिनंदन..आजच क्रांतीअग्रणी डाँ. जी डी बापू लाड यांची जयंती आहे. आणि आजच त्यांचे सुपुत्र आण्णा हे आमदारही झाले .हा दुग्धशर्करा योग जूळून येणे म्हणजेच खर्या अर्थाने कुंडलच्या क्रांतीची धग,रग आणि आग अद्याप जशीच्या तशी आहे याचाच पुरावा म्हणावा लागेल. मा. अरुण (अण्णा) लाड यांच्या रूपाने एका सच्च्या समाजपरिवर्तनाच्या लढ्याची आस असलेल्या, डाव्या पुरोगामी विचारसरणीच्या मुशीतून तयार झालेल्या व सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या  या दमदार अशा नूतन आमदारास डाव्या,पुरोगामी चळवळीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा .
अण्णा तुम आगे बढो!!!
 हम सब तुम्हारे साथ है..हाच नारा अधिक  बुलंद होत जाणार यात शंकाच नाही.

मारुती शिरतोडे
जिल्हाध्यक्ष,प्रगतिशीललेखक संघ,जि.सांगली.9096239878
To Top