Sanvad News बालगंधर्व विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन.

बालगंधर्व विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन.


राजहंस ऊर्फ बालगंधर्व विद्यालय नागठाणे येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपसरपंच श्री उत्तमराव बनसोडे, पोलीस पाटील श्री. दिपक कराडकर, जीवन विकास संस्थेचे सदस्य श्री संपतराव (बापू) पाटोळे, मुख्याध्यापक श्री. डी.एन्.माने (सर) यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक श्री. के.डी. कांबळे (सर) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसिंह नाना पाटील यांचे विषयी मनोगत व्यक्त केले.आभार श्री. एस. आर झेंडे (सर) यांनी मानले. सदर कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
To Top