Sanvad News विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न.

विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयात शिक्षक पालक सभा संपन्न.



पंडित विष्णू दिगंबर पलूसकर विद्यालयात इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा मार्गदर्शनासाठी शिक्षक-पालक सभा आयोजित करण्यात आली होती.

 
1997 पासून पलूस मध्ये सुरू असलेले हे नवोदय विद्यालय हुशार, होतकरू विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयोगी आहे याच विद्यालयातून वैभव वाघमारे, प्रवीण डुबल ,संग्राम शिंदे हे  विद्यार्थी  UPSE पास झालेले आहेत. आज जिल्हाधिकारी  पदावरती काम करत आहेत. आपणही आपल्या पाल्याला या परीक्षेसाठी बसवावे असे आवाहन केले.Online Form  भरण्याचे काम सुरू आहे. लेखी परीक्षा.होईल. Merit मध्ये नवोदयकडून निवड झाली तर  इयत्ता 6 वी मध्ये 2021-22  मध्ये नवोदय विद्यालयात  शिक्षण घेण्याची संधी मिळेल व पुढील शिक्षण शासनाकडून केले जाईल, ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2020 अशी आहे...अधिक माहिती साठी www.navodaya.gov. in या संकेतस्थळावर भेट द्या.

यावेळी मुख्याध्यापक टी.जे.करांडे  म्हणाले  पलूस तालुक्यात असलेले नवोदय विद्यालयातून हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते पालकांनी याचा लाभ घ्यावा. स्पर्धापरीक्षेची तयारी होण्यासाठी ही परीक्षा खूप महत्वाची आहे. पालकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसवावे. मुलांचे भविष्य शिक्षक आणि पालकच उज्ज्वल करू शकतात. पालकांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये सकारात्मक विचार रुजवावेत असे सांगितले.
सर्वांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख ए.के. बामणे  यांनी केले.यावेळी बी.डी.सूर्यवंशी  यांनी नवोदय परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले सर्व पालकांना नवोदय परीक्षेस फाँर्म भरण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. नवोदय परीक्षेचे महत्त्व समजावून सांगितले.
 या शिक्षक - पालक  सभेसाठी सर्व शिक्षक, पालक बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top