Sanvad News शिवाजीराव पाटील गटाला मिळणार नामदार जयंतराव पाटील साहेबांचे बळ; धैर्यशील पाटील यांनी घेतली भेट.

शिवाजीराव पाटील गटाला मिळणार नामदार जयंतराव पाटील साहेबांचे बळ; धैर्यशील पाटील यांनी घेतली भेट.

 

स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील यांनी  नेतृत्व केलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले असून स्वर्गीय शिवाजीराव पाटील यांच्या निधनाला 15 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. शिवाजीराव पाटील यांच्या निधनानंतरही तालुका स्तरापासून ते राज्य, राष्ट्रीय स्तरापर्यंत संघटना टिकवून ठेवण्याचे काम तालुका,जिल्हा व राज्य पदाधिकारी चांगल्या जोमाने करत असून या संघटनेला शंभर वर्षाची परंपरा व मोठा इतिहास आहे. शिवाजीराव पाटील यांचे नातू धैर्यशील पाटील हे सध्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांनी नुकतीच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांची सांगली दौऱ्यावर असताना भेट घेतली. 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुका ,जिल्हा व राज्य पातळीवरील कामकाजा विषयी व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्ना विषयी सविस्तर चर्चा केली. राज्यातील तमाम प्राथमिक शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या शि.द.पाटील गटाला बळ देणार असल्याचे मत ना.जयंतरावजी पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

                महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय माजी आमदार शिवाजीराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी दोन वेळा आमदारकी दिली. त्याकाळात शिवाजीराव पाटील यांचे महाराष्ट्रातील शिक्षकांच्या चळवळीत एकछत्री अंमल होते. त्यामुळे शिक्षकांचे सर्व प्रश्न राज्य शासनाकडून सहज सोडवले जात होते.



कालांतराने शिक्षक संघात दुफळी निर्माण झाल्यामुळे राज्य स्तरावरील शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळणे कठीण होऊ लागले. अशात शिवाजीराव पाटील यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी दुःखद निधन झाले. महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक शिक्षकांना आपण पोरके झालो आहोत असा अनुभव येऊ लागला. अशा कठीण परिस्थितीतही शिवाजीराव पाटील यांच्या निधनानंतरही शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी तालुका स्तरापासून राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत शिक्षक संघाचा झंजावात कायम ठेवला असून.

 येणाऱ्या दिवसात शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोणातून शि.द.पाटील गटाला बळ देणार असल्याचे मत ना.जयंतरावजी पाटील यांनी शिवाजीराव पाटील यांचे नातू धैर्यशील पाटील व सांगली जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस अमोल माने यांच्याशी बोलताना व्यक्त केले तसेच राज्य संघाच्या महामंडळ सभेसही उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

सदरचीभेट सांगली विधानसभा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष तथा पद्माळे गावचे सरपंच सचिन जगदाळे यांनी घडवून आणली. यावेळी सांगली जिल्हा शहर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार , सांगली  विधानसभा युवक राष्ट्रवादी अध्यक्ष तथा पद्माळे गावचे सरपंच सचिन जगदाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

To Top