जिल्हा परिषद शाळा नं.2 पलूस येथे शालेय व्यवस्थापन समिती व पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
27 जानेवारी पासून इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे शाळा सुरू करण्यासंबंधी व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारी संबंधी या बैठकीत चर्चा करण्यात आली.शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पाळावयाचे नियमांची कल्पना पालकांना देणेत आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी सौ.मेघा कुंभार होत्या.या बैठकीस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील, शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.मालन आवटे, श्री संभाजी पाटील, सौ सोनाली चव्हाण, श्रीमती शैलजा लाड, श्री. मारुती शिरतोडे ,सौ सुनीता पवार ,श्री.जगन्नाथ शिंदे यांचे सह सर्व पालक उपस्थित होते.बैठकीला मारुती शिरतोडे व गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ सुवर्णा थोरात यांनी मार्गदर्शन केले.
स्वागत व प्रास्ताविक सौ.सोनाली चव्हाण यांनी केले तर आभार सौ.मालन आवटे यांनी मानले.