Sanvad News क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये पालकसभा संपन्न

क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये पालकसभा संपन्न


सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन बुरुंगवाडी येथे पालकसभा संपन्न झाली. संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष श्री.सुनिल(बापू)जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यवाह सौ. वनिता जाधव यांच्या प्रमुख उपस्थतीत सभा संपन्न झाली.
शासनाच्या निर्णयानुसार इयत्ता ५ वी ते ८ वी चे वर्ग सुरू करणेबाबत चर्चा करण्यात आली.सदर वर्ग बुधवार दिनांक २७ जानेवारी पासून सुरु होणार आहेत.या पार्श्वभूमीवर पालकांचे हमीपत्र भरणे,शाळा निर्जंतुकीकरण करणे,विद्यार्थी बैठक व्यवस्था,शाळेची वेळ,विद्यार्थी वाहतूक व्यवस्था,पालकांची जबाबदारी,शिक्षकांची कोव्हिड चाचणी,अभ्यासक्रमाचे नियोजन,स्पर्धा परीक्षा आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्व नियमावलीचे पालन करून शाळा सुरू करण्यास उपस्थित पालकांनी संमती दिली.स्वागत मुख्याध्यापिका दिपाली जाधव यांनी सूत्रसंचालन निशांत कोळेकर यांनी तर आभार स्नेहल पाटील यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक,सर्व वर्गांचे पालक प्रतिनिधी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


To Top