मदरसा डॉ.झाकीर हुसैन रेसिडेन्सीयल ऊर्दू हायस्कूल, पलूस यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आणि करिअर गाईडन्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी १०वी, १२वी, पास, नापास, डिप्लोमा होल्डर, ग्रॅज्युएट, सुशिक्षित बेरोजगार यांनी आपापल्या कुवतीनुसार आणि आवडीनुसार कोणता मार्ग निवडावा हे आजच्या विद्यार्थ्यांना समजणे फार महत्वाचे आहे, त्यासाठी प्रेरक वक्ता म्हणून प्रसिद्ध असणारे प्रतिष्ठीत करिअर कौंसिलर, प्रख्यात प्लेसमेंट ऑफिसर प्रा.तौहीद मुजावर यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तासगाव येथील हाफिज अय्याज मोमीन आणि रामानंद नगर येथील प्रसिद्ध उद्योजक नसीर भाई मुल्ला उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम कोरोना बाबतचे सर्व नियम आणि मार्गदर्शक सूचना पालन करुन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक हाजी कारी बदिउज्जमा आणि मुख्याध्यापक यांनी सांगितली आहे.