Sanvad News भिलवडी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न;गुणवंत शिक्षकांचा संस्थेच्या वतीने गौरव..

भिलवडी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न;गुणवंत शिक्षकांचा संस्थेच्या वतीने गौरव..

    

भिलवडी शिक्षण संस्थेच्या संकुलातील सेकंडरी स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.संस्थेचे अध्यक्ष मा.विश्वास चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी बोलताना विश्वास चितळे म्हणाले की,कोरोना काळात भिलवडी शिक्षण संस्थेच्या सर्व विभागातील शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करत अध्यापनाच्या कामकाजात सातत्य ठेवून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविली.या बद्दल सर्व शिक्षक वर्गांचे अभिनंदन केले.लवकरात लवकर कोरोना पासून स्वातंत्र्य मिळून शालेय कामकाज पूर्ववत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.


शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांना टाईम्स ऑफ इंडिया व डेल कंपनी यांचे वतीने बिझनेस इमपॅक्ट अवॉर्ड, इनोव्हेशन लीडर इन अग्री कल्चर ल अँड अॕलाईड इंडस्ट्रीज हा पुरस्कार मिळाले बद्दल संस्थेच्या सर्व विभागाच्या प्रशासकीय प्रमुखांनी सत्कार केला.संचालक गिरीश चितळे यांची सार्वजनिक वाचनालय भिलवडीच्या अध्यक्षपदी व सांगली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक शाखा भिलवडीच्या सल्लागार पदी निवड झाले बद्दल सत्कार करण्यात आला.संस्थेच्या विविध शाखांमधील गुणवंत,विविध पुरस्कार प्राप्त तसेच विविध पदांवर निवड झालेल्या शिक्षक बंधू भगिनींचा संस्था अध्यक्ष विश्वास चितळे व संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  


  निसर्गातील नवरंग या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी काढलेल्या निसर्गातील फोटोंचे संकलन करून तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. संकलन व नियोजन मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार व ए. एस. पोतदार यांनी केले.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेबचोपडे, विश्वस्तजे.बी.चौगुले,संचालकगिरीशचितळे,दादासाहेबचौगुले,डी.के.किणीकर,प्रा.धनंजयपाटील,जयंतकेळकर,व्यंकोजी जाधव,संजय कदम,संस्था सचिव संजय कुलकर्णी,सर्व आजिव सदस्य प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे, मुख्याध्यापिका सौ.शुभांगी मन्वाचार, सुकुमार किणीकर, विद्या टोणपे,स्मिता माने, सुचेता कुलकर्णी आदींसह सर्व विभाग प्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा.पी.बी.पाटील यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले,सूत्रसंचालन प्रा.अशोक नलावडे यांनी केले.
To Top