Sanvad News सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची कामगिरी कौतुकास्पद : डॉ. मानाजी कदम; प्रजासत्ताक दिन संपन्न.

सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेची कामगिरी कौतुकास्पद : डॉ. मानाजी कदम; प्रजासत्ताक दिन संपन्न.

सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात चमकत आहेत. गेल्या वीस वर्षात शाळेने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असून भविष्यात प्रशाला यशाच्या दैदिप्यमान शिखरावर असेल, असे प्रतिपादन विटा येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व कोविड योद्धा डॉ. मानाजी कदम यांनी व्यक्त केले.

ते प्रशालेत आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विटे येथील प्रसिद्ध व्यापारी कांतीलाल जोगड , पंडितराव होनमाने, नंदादेवी मेटकरी, प्रशालेचे संस्थापक साहित्यिक रघुराज मेटकरी, डॉ. ऋषिकेश मेटकरी, प्राचार्या वैशाली कोळेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ते पुढे म्हणाले की, शाळेच्या जडणघडणीत शिक्षकांचा वाटा मोलाचा असून पालकांचाही विश्वास प्रशालेने  कमावला आहे. यावेळी संस्थापक रघुराज मेटकरी व कांतीलाल जोगड यांनीही मनोगत व्यक्त केले.सुरुवातीला कांतीलाल जोगड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



 राष्ट्रीय प्रज्ञाशोध मंथन परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आदित्य विकास बिसुरकर, निर्जला विकास महाडिक ,मेघा सुभाष होनवार ,कार्तिकी नितीन महाडिक ,हर्षवर्धन विठ्ठल साळुंखे ,आर्यन सिद्धनाथ इंगळे ,पार्थ रामचंद्र तोडकर, वरद अशोक पाटील ,अंतरा महेश उबाळे ,अनुष्का सतीश जाधव या विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावल्याने त्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव प्रशालेत करण्यात आला. याशिवाय प्रशालेचा विद्यार्थी आर्यन विनोद बाबर याने कराटे स्पर्धेत यश पटकावल्याबद्दल त्याला मेडल देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमात शेवटी खाऊवाटप करण्यात आला.

प्रास्ताविक प्रशालेचे कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले. सूत्रसंचालन शंकर कांबळे यांनी तर आभार चंदन तामखडे यांनी मानले. कार्यक्रमास प्रशालेचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, पालक उपस्थित होते .सदर कार्यक्रम कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून संपन्न झाला.

To Top