Sanvad News पलूसकर शैक्षणिक संकुलात हळदी कुंकू समारंभ व माता पालक मेळावा संपन्न

पलूसकर शैक्षणिक संकुलात हळदी कुंकू समारंभ व माता पालक मेळावा संपन्न



पंडित विष्णू  दिगंबर पलूसकर शिक्षण संस्था पलूस येथे महिला पालक मेळावा व हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला.यावेळी पलूस पंचायत समिती येथील विषय तज्ञ सौ.शमीम नदाफ,संस्थेच्या संचालिका सौ.वर्षाभाभी शहा ,मुख्याध्यापक  टी.जे.करांडे,सौ. सविता परांजपे, सर्व  पदाधिकारी, शिक्षिका  व महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना सौ .शमीम नदाफ म्हणाल्या .स्वतःबरोबर इतरासाठीही जगले पाहिजे.मुलींना संस्कार घरातूनच घडले पाहिजेत .मुलींना सक्षम बनविण्यासाठीची जबाबदारी आईची आहे.जिद्द व चिकाटी असेल  तर आपण आपल्या जीवनात निश्चितच यशस्वी होतो , आजच्या विज्ञान युगात टिकण्यासाठी कष्टाची कास धरावी असे प्रतिपादन केले.


     यावेळी बोलताना टी.जे.करांडे म्हणाले महिलांनी स्वावलंबी  कणखर असले पाहिजे.स्वतःचे गुणदोष स्वीकारुन पुढे गेले पाहिजे .पालकांनी आपल्या महत्त्वकांक्षेचे बळी मुलांना बनवू नये.त्यांचा निरागसपणा चांगुलपणा जपला पाहिजे .महिलांनी स्वतःच्या तब्यतेची काळजी घेतली पाहिजे. शारीरिक भावनिक बौद्धिक काळजी घेऊन व्यक्तीमत्व विकास साधला पाहिजे.
         प्रमुख मान्यवरांचा परिचय सौ.सरकवास मँडम, प्रास्ताविक सौ. अलका बागल,सुञसंचालन सौ.तृप्ती पाटील, आभार सौ.चौगुले मँडम यांनी मानले.
To Top