Eschool Times या मराठी भाषेतील डिजिटल शैक्षणिक व्यासपीठास जगभरातील वाचक वर्गा कडून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.आज २१ जानेवारी रोजी एकुण वाचक संख्या दोन लाखांवर पोहोचली आहे.
Eschool Times च्या सर्व टीमकडून या यशाबद्दल जगभरातील वाचक बंधू - भगिनींचे ऋण व्यक्त करण्यात येत आहे.
एकूण दोन लाख वाचक संख्येपैकी,भारतात १.८४ लाख इतकी वाचक संख्या आहे तर हाॅंगकाॅंग,इंडोनेशिया,अमेरिका, जपान व अन्य इतर देशातील वाचक संख्या १६ हजारांवर आहे.महाराष्ट्र राज्य,भारत देशांसह जगभरातील मराठी वाचक शैक्षणिक माहितीसाठी Eschool Times ला पसंती देतात.
Eschool Times या डिजिटल शैक्षणिक व्यासपीठावरून विविध शैक्षणिक उपक्रम,शालेय,सहशालेय उपक्रम,शिक्षण क्षेत्रातील विविध शासन निर्णय,धोरणात्मक निर्णय, शैक्षणिक बातम्या,विविध लेख आदीं माहिती प्रकाशित केली जाते.दर्जेदार लेखन,संपादन आणि तात्काळ प्रसिध्दी यामुळे राज्यभरातील शाळा,महाविद्यालये,शैक्षणिक संस्था, शिक्षक,शिक्षकेत्तर संघटना,विद्यार्थी, पालकवर्गातून उस्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.