मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त महालक्ष्मी हायस्कूल देशिंग ता.कवाठेमहंकाळ मध्ये कविसंमेलन संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कवी धनंजय सोलनकर होते.तसेच सौ.अर्चना माने पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना धनंजय सोलनकर यांनी मराठी भाषेचे महत्त्व विषद केले .भाषा मेली तर राष्ट्र मरेल,ही भिती व्यक्त केली .यावेळी त्यांनी कवितावाचन करुन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले .तसेच सौ.अर्चना माने पाटील यांनी मराठी भाषा संवर्धनाची निकड सांगितली .यावेळी वीस विद्यार्थ्यांनी कविता वाचन केले.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्तविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा भोसले यांनी केले .पाहुण्यांची ओळख सौ.मनीषा पाटील यांनी करुन दिली .तर सुत्रसंचालन सौ.सुरेखा कांबळे यांनी केले.यावेळी संजय आसुदे व सतिश भोसले उपस्थित होते.