इस्लामपूर येथील प्रकाश प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.
प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.मधुकुमार नायर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी प्रकाश प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत देसाई सर व प्रकाश माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सिंधू नायर उपस्थित होत्या
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. नायर म्हणाले की नेताजी बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले काम हे विशेष उल्लेखनीय आहे,तरी सर्व विद्यार्थ्यांनी नेताजी बोस यांचा जीवनामध्ये आदर्श ठेवला पाहिजे नेताजी मुळेच देशातील स्वातंत्र्य चळवळीला बळ मिळाले व देश स्वतंत्र झाला.
यानंतर प्रकाश प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक देसाई सर म्हणाले की शाळा सुरू झाल्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवी तील विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत.
कार्यक्रमाची प्रस्तावना सौ. स्वाती पवार मॅडम यांनी केली व आभार प्रदर्शन सौ. रोहिणी पवार मॅडम यांनी केले.