Sanvad News छ.शिवाजी विद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदीर दुधोंडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात.

छ.शिवाजी विद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदीर दुधोंडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात.


छ.शिवाजी विद्यालय आणि प्राथमिक विद्यामंदीर दुधोंडी येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.रामानंदनगर येथील सिद्धनाथ गॅस एजन्सी चे सर्वेसर्वा श्री.संदीप वसंतराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.जयमाला संदीप पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
आयुष्यात सर्वांनी माणसे मिळवावीत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी जिद्द ,मनापासून प्रयत्न आणि आत्मविश्वास असणे आवश्यक आहे असे मनोगत  व्यक्त केले.शालेय परिसर व विद्यालयातील विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.संदीप पाटील सरांचे वडील कै.वसंतराव संपतराव पाटील हे विद्यालयाच्या पहिल्या  बॅचचे पहिले विद्यार्थी होते त्यांच्या जीवनातील काही आठवणी, लोकशाही शासन पद्धती तसेच शोषणमुक्त व वर्गविरहित समाज निर्माण होणे आवश्यक आहे असे विचार  श्री.जी.बी.सुर्वे सर यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये मांडले . 

    संस्थेचे सचिव श्री.मिलिंद जाधव साहेब यांनी मान्यवरांचे स्वागत व विद्यालयाची उत्तरोत्तर होत असलेल्या  प्रगतीची माहिती दिली.श्री.धनंजय जाधव यांनी कै.वसंतराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला.मुख्याध्यापक श्री.ए.एस.कांबळे सरांनी प्रास्ताविक केले.सौ.एस.जे .मोहिते 
यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला,सूत्रसंचालन श्री एस.ए बुर्ले यांनी केले.आभार श्री.एस.बी.मोमीन यांनी मानले.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री.जी.बी.सुर्वे सर,सचिव श्री मिलिंद जाधव साहेब,श्री.शंकरराव साळुंखे,श्री.बी.वाय. साळुंखे सर ,श्री.धनंजय जाधव,श्री.जनार्दन साळुंखे,श्री.रंगराव पेटकर,
श्री.दत्तात्रय गावडे श्री.ललित मोहन सुर्वे आदि मान्यवर उपस्थित  होते.तसेच दोन्ही विद्यालयाचे शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर सेवकवृंद  उपस्थित होते .
To Top