इस्लामपूर येथील प्रकाश प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.मधुकुमार नायर व प्रकाश प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत देसाई सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक श्रीकांत देसाई म्हणाले की, विद्यालयात बालिका दिन व सावित्रीबाई फुले जयंती निमित्त व मुलांच्या कलागुणांना जास्तीत जास्त वाव मिळावा म्हणून वेगवेगळ्या स्पर्धांचे ऑनलाइन आयोजित केले करण्यात आले आहे.
स्पधाऀ चार गटांमध्ये घेण्यात येणार आहेत
इयत्ता पहिली व दुसरी साठी चित्रकला स्पर्धा, इयत्ता तिसरी व चौथी साठीनिबंध स्पर्धा,इयत्ता पाचवी भाषण स्पर्धा, इयत्ता सहावी ते आठवी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन शाळेच्या वतीने गौरव केला जाणार आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना सौ.मेघा फार्णे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.संग्राम पवार सर यांनी केले.