Sanvad News कास्ट्राईब शिक्षक संघटना सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर.

कास्ट्राईब शिक्षक संघटना सांगली जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर.



कास्ट्राईब शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा सांगलीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी जाहीर केल्या.
यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी महमदरफिक पटेल, प्रदीप गवळी,जिल्हा कार्याध्यक्षपदी दयानंद सरवदे, जिल्हा सचिवपदी विद्याधर रास्ते, जिल्हा कोषाध्यक्षपदी अशोक हेळवी,रामचंद्र टोणे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख विनोदिनी मिरजकर, संघटक सचिव मुमताज खतिब, संगिता कांबळे, अति. सरचिटणीस पदी सुरेश कोळी, टी. आर नदाफ सौ. पौर्णिमा व्होटकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ. अनिता प्रज्ञावंत, कमल चव्हाण, यांची निवड करण्यात आली. त्यांना निवडीची पत्रे, पुष्पगुच्छ वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी व जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांच्या हस्ते देवून सत्कार करण्यात आला, शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध प्रश्नांनांना न्याय मिळवून देण्यासाठी, संघटना वाढीसाठी प्रयत्न करू असे नुतन पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाश वायदंडे, दगडू सातपुते सर्व सभासद बंधु-भगिनी उपस्थित होते.
To Top