भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये प्रयोग शाळा परिचर विजयकुमार केरु मोरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार संपन्न झाला.
नियत वयोमानानुसार व शासकीय नियमानुसार विजयकुमार मोरे सेवानिवृत्त झाले. यावेळी संस्था व शाळेच्या वतीने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार, उपमुख्याध्यापक एस. एन कुलकर्णी, पर्यवेक्षक संभाजी माने यांच्या हस्ते चांदीची मुर्ती, शाल, श्रीफळ व बुके देवून उभयतांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेला एक लाख रुपये देणगी दिल्याबद्दल राजेंद्र शिवलिंग कुंभार कुटुंबियांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी मुख्याध्यापक बी. एन. मगदूम,राजेंद्र कुंभार, गजानन पाटील, प्रल्हाद पाटील व पांडुरंग सुर्यवंशी सौ अनुराधा शिंदे, दिलीप रांजणे यांनी मनोगते व्यक्त केले.
उत्तम आरोग्याच्या व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.आयुष्यभर आपण नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करणे यातच आयुष्याचे सार्थक असते ती जबाबदारी मी पार पाडली. असे मनोगत विजयकुमार मोरे यांनी व्यक्त केले.तसेच संस्थेस देणगी प्रदान केली. विजयकुमार मोरे व राजेंद्र कुंभार यांनी संस्थेला दिलेल्या देणगी बद्दल अध्यक्षीय मनोगतात विश्वास चितळे यांनी ऋण व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त जे. बी चौगुले, संचालक डी . के किणीकर, संजय कदम, जयंत केळकर, व्यंकोजी जाधव, माजी मुख्याध्यापक बी. एन मगदूम, एस. एस भोकरे, बी डी वाळवेकर सुकुमार किणीकर, विद्या टोणपे,स्मिता माने, महेश पाटील, सुचेता कुलकर्णी, माजी संचालक शिवाजी माने, नामदेव तावदर, दिलीप रांजणे व मोरे कुटुंबिय उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, सुत्रसंचालन शिवाजी कुकडे यांनी तर आभार मुख्याध्यापिका सौ. शुभांगी मन्वाचार यांनी मानले. .