प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कूल भोसरी येथील विद्यार्थिनी कु.स्वराली शिवाजी साळुंखे(इयत्ता -4 थी) हिने अबॅकस स्पर्धेत सातव्या क्रमांकाच्या परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेती ठरली आहे.
सदर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.महाराष्ट्रासह देश व परदेशातून एकूण एक हजार एकशे चाळीस विद्यार्थी या परीक्षेस बसले होते.स्वरालीने पाच मिनिटां मध्ये पन्नास प्रश्न सोडवून पन्नास पैकी पन्नास गुण प्राप्त केले.
तिने या आधीच्या परीक्षेमध्ये दुसरा क्रमांक पटकाविला आहे.ऑनलाईन परीक्षेत महाराष्ट्रात विजेती ठरली आहे.स्वराली विविध ऑनलाईन ऑलिंपिड,अबॅकस ऑनलाईन परीक्षा देत आहे.अबॅकस परीक्षेमुळे मुलांच्या बुध्दीमध्ये वाढ होत आहे.गणित विषयाच्या ज्ञानामध्ये प्रगती होत आहे.
तिला शिक्षिका कांचन कितुकले,पद्मा,आई वडील यांचे योग्य असे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.