कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना व कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे साहेब व माध्यमिक शिक्षण विभाग अधिक्षक म्हणून विजय सोनवणे साहेब त्यांनी पदभार स्वीकारला म्हणून त्यांचा राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी, सचिव बाबासाहेब माने, शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे,सचिव विद्याधर रास्ते, मुख्य संघटक अशोक हेळवी, महिला आघाडी प्रमुख विनोदिनी मिरजकर, जि. प कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष दिपक बनसोडे, गणेश पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संघटना नेहमी प्रशासनास त्यांच्या कामात सहकार्य करेल. व शिक्षक बंधु-भगिनींचे प्रश्न सोडविण्यास मदत करेल असे जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे यांनी आश्वासन दिले. शिक्षक बंधु-भगिनींचे प्रश्न विना विलंब सोडविण्यावर भर राहील असे मा शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे साहेब यांनी सांगितले. यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्या संगिता कांबळे, मुमताज खतिब, कमल चव्हाण, आदी पदाधिकारी उपस्थित होते.