भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल भिलवडी येथे निर्भया पथकाची सहविचार सभा संपन्न झाली.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार अध्यक्षस्थानी होत्या.
भिलवडी पोलीस ठाणे व सेकंडरी स्कूल भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. भिलवडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस नाईक परवीन मुलाणी, महिला पोलीस शिपाई शीतल देशमुख, सारीका मदने यांनी मुलींना मार्गदर्शन केले. स्वसंरक्षणासाठी पोलीसांची मदत घ्या, मोबाईल वापरताना दक्षता घ्या असा संदेश दिला. साक्षी मोरे व डिचकळकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या पाहुणे परिचय साधना भोसले यांनी , स्वागत व प्रास्तविक मनिषा पाटील तर आभार शर्मिला पाटील यांनी मानले. अनुराधा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी, उच्चमाध्यमिक विभाग प्रमुख जी.एस.साळुंखे , एस.व्ही. कुकडे उपस्थित होते.