भारताचा स्वातंत्र्य लढा चार टप्प्यात लढला गेला.त्यातील पहिल्या टप्प्यात 1818ते 1832 या कालखंडात इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारा राजा उमाजी नाईक म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचा मेरूमणी असून ते फासावर गेलेले भारताचे आद्य क्रांतिवीर आहेत असे प्रतिपादन आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष मारुती शिरतोडे यांनी केले.
माळवाडी ता.पलूस येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या १७९ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे गटनेते शरद भाऊ लाड होते. मारुती शिरतोडे म्हणाले की सतत १४ वर्षे इंग्रजांना सळो की पळो करून सोडणार्या या क्रांतिवीराने गोरगरीब जनतेला त्रास देणा-या पाटील ,कुलकर्णी, सावकार यांना चांगलेच वठणीवर आणले.सतत डोंगरद-यात राहून छ.शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने कंपनी सरकारला जेरीस आणले.स्वतःचा जाहीरनामा प्रकाशित करून भारतातील तमाम जनतेला ब्रिटिशांचे सरकार उलथून पाडण्याचे आवाहन केले.उमाजीला पकडून देणारास इंग्रज सरकारने आजपासून सुमारे दोनशे वर्षापूर्वी देण्यासाठी दहा हजार रूपये रोख व चारशे बिघा जमीन एवढे मोठे बक्षीस लावले होते.त्यामुळे या आद्य क्रान्तिवीरास फितुरीने पकडून ३ फेब्रुवारी २८३२ रोजी पुणे येथील खडकमाळ या ठिकाणी फाशी दिले. त्यांचा फाशी दिलेला तीन फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्र सरकारने 'आद्य क्रांतिकारक हुतात्मा दिन म्हणून जाहीर करावा' अशी मागणी तमाम महाराष्ट्रवासीयांची आहे. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य शरद भाऊ लाड म्हणाले राजे उमाजी नाईकांचा इतिहासामधून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी आणि आपल्या अंगी शौर्य चापल्य आणि दानत या गुणांची जोपासना करावी. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विशाल नलवडे, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे राज्याध्यक्ष दगडू जाधव, सरचिटणीस हिम्मतराव मलमे ,उपाध्यक्ष सुनील दलवाई ,कोषाध्यक्ष महेश मदने,संघटक निखील जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक निवास मोटकट्टे यांनी केले तर आभार करण मोटकट्टे यांनी मानले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जय मल्हार ग्रुप माळवाडी तालुका पलूस यांनी केले. या व्याख्यानास राहूल मोटकट्टे, हर्षद गुजले,अभिषेक गुजले,सौरभ मोटकट्टे, विक्रम भंडलकर,अक्षय मोटकट्टे, वैभव मोटकट्टे, अंकुश मोटकट्टे,सूरज मंडले,किरण मोटकट्टे सह माळवाडी व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.