Sanvad News सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जाचा व्याजदर कमी न केल्यास संचालक पदाचा राजीनामा देणार-अर्चना खटावकर (कोळेकर)

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जाचा व्याजदर कमी न केल्यास संचालक पदाचा राजीनामा देणार-अर्चना खटावकर (कोळेकर)


सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने कर्जाचा व्याजदर कमी न केल्यास आपण शिक्षक बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा लेखी पत्राद्वारे अर्चना खटावकर (कोळेकर) यांनी दिला आहे. सदर लेखी पत्र त्यांनी शिक्षक बँकेच्या पदाधिकारी वर्गास दिले आहे.
शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेऊन आणि शिक्षक बँकेच्या सर्व सभासदांनी भरघोस मतांनी आम्हा सर्व संचालकांना निवडून दिले. विद्यमान संचालक मंडळानेही स्टॅम्प ड्युटी कमी करणे,कायम ठेवी परत देणे, आरटीजीएस, एनईएफटी सुविधा, कर्जदार मयत सभासदांना २० लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी तर निष्कर्जी सभासदांच्या कुटुंबास ३ लाख रुपयांची आर्थिक मदत असे अनेक सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत. कर्जाचा व्याजदर दोन वेळा अर्धा टक्‍क्‍यांनी कमी करून डिव्हिडंडही दरवर्षी वाढवत ६ टक्क्यांपर्यंत दिला आहे. परंतु वारंवार कर्जाचा व्याजदर अजूनही कमी करावा यासाठी बऱ्याचदा विनंती,चर्चा करूनही एका विशेष व्यक्तीकडून याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे.
सभासदांच्या मनातील कर्जाचा व्याजदर कमी करण्यास मी एक संचालक म्हणून अपयशी ठरली आहे. यामुळे मी सर्व समितीच्या कार्यकर्त्यांची व शिक्षक बॅंकेच्या सर्व सभासदांची क्षमा मागते.अनेक वेळा शाळा शिबिरे आणि विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक बंधू-भगिनींची भेट झाली असता सर्व सभासद बंधू भगिनींनी बँकेच्या समान हप्त्याच्या कर्जाचा व्याजदर एक अंकी करण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली. सभासदांच्या व माझ्या मनातील कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा निर्णय न झाल्यास मी माझ्या संचालक पदाचा राजीनामा देत आहे.सर्व सभासद बंधु-भगिनींच्या कर्जाच्या व्याजदराबाबतच्या भावना लक्षात घेऊन शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणीच्या मिटिंगमध्ये बर्‍याचवेळा कर्जाचा व्याजदर कमी व्हावा यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु कर्जाचा व्याजदर कमी करण्यात आम्ही अपयशी ठरलो. 
कर्जाचा व्याजदर कमी करावा असे मत वारंवार मांडल्यामुळे एका विशेष व्यक्तीकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. माझ्या शिक्षक समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचा व सर्व संघटनेतील मित्र परिवाराचा मी शतशः ऋणी आहे. कारण आपण सर्वांनी मला खूप प्रेम दिलेत. कर्जाचा व्याजदर लवकर लवकर कमी न झाल्यास मी सुद्धा शिक्षक समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत आहे असल्याचे मत यावेळी भागवत उर्फ युवराज कोळेकर मांडले आहे.
To Top