खाजगी प्राथमिक शाळा व शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी निस्पृह पणे लढणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी केले.आष्टा ता.वाळवा येथे जिजामाता बालकमंदिर येथे आयोजित आष्टा शहरातील खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या सहविचार सभेत ते बोलत होते.
जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे,संघटनेचे मार्गदर्शक चंद्रकांत चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष नितेंद्र जाधव,कोषाध्यक्ष संतोष जाधव,पलूस तालुका अध्यक्ष शरद जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न झाला.
शिक्षक समितीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले बद्दल खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे वाळवा तालुका अध्यक्ष दत्तात्रय डफळे यांचा चंद्रकांत चव्हाण व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेची कार्यप्रणाली,सर्वसमावेशक धोरणे,शिक्षकांच्या सन्मानासाठी वेळप्रसंगी घेतली जाणारी आक्रमक भूमिका.संघटना म्हणून नव्हे तर कुटुंब म्हणून प्रत्येक शिक्षकांना दिला जाणारा आदर आदी बाबी आमच्यासाठी कौतुकास्पद व अभिमानास्पद असल्याची मनोगते उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी बोलताना संतोष जाधव म्हणाले की,खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या माध्यमातून विविध प्रशासकीय कामे,शाळा व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत.सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीत शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आपणास संधी मिळाली आहे.आपणा सर्वांच्या एकसंघ प्रयत्नातून परिवर्तन घडवूया व शिक्षक सभासदांचे हित साधूया.
नितेंद्र जाधव म्हणाले की,संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या हितांसाठी आपण विविध आघाड्यांवर एकसंघ पणे प्रयत्न करीत आहोत.आपल्या सामूहिक शक्तीला मोठ्या प्रमाणात यश मिळत आहे.
शरद जाधव यांनी शिक्षक परिषदेच्या निर्मिती पासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा आपल्या मनोगतातून घेतला.
यावेळी विजय जाधव,सौ.मीनाक्षी जगताप,सौ.सोनल पारधी,अमोल लाटवडे,प्रमोद कुंभार,सौ.सुरेखा पारधी, नयणारानी कांबळे,वैशाली शेटे,शुभांगी पाटील,अनिल राठोड,अर्चना गुरव,अर्चना भानुसे,अस्मिता इंगळे,वैशाली कुरणे आदीसह आष्टा शहरातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत जिजामाता बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.ज्योती पोचे यांनी केले. दत्तात्रय डफळे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार भोलासो आंबी यांनी मानले.