Sanvad News जि.प.शाळा आमणापूर येथे बालक मेळावा उत्साहात संपन्न.

जि.प.शाळा आमणापूर येथे बालक मेळावा उत्साहात संपन्न.


पलूस तालुक्यातील आमणापूर येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत बालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सरपंच विश्वनाथ सुर्यवंशी उपसरपंच अशोक काटे ग्रामसेवक मिलिंद आपटे, कृष्णा लोहार, रेखा माने, मोहन घाडगे, ग्रा. पं. कर्मचारी, सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
आमचा गाव आमचा विकास आराखडा या उपक्रमाअंतर्गत बालक मेळाव्यात अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त मते मांडली. शाळेत क्रिडा मैदान, क्रिडा साहित्य, ई लर्निग, शुध्द पाणी, वाचनालय या सुविधा असाव्यात. गावात स्वच्छता असावी. बाग बगिचा, तालीम सुविधा व्हावी. नदी परिसर स्वच्छ असावा. गावात चांगले रस्ते व्हावेत. असे विद्यार्थ्यांनी सुचवले.
सरपंच, ग्रामसेवक यांनी विद्यार्थ्यांनी चांगली मते मांडल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले.





To Top