Sanvad News सभासद हिताचा कोणताच मुद्दा नसलेल्या विरोधकांना येणाऱ्या निवडणुकीत सभासदच धूळ चारतील-प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल गुरव यांचे प्रत्युत्तर

सभासद हिताचा कोणताच मुद्दा नसलेल्या विरोधकांना येणाऱ्या निवडणुकीत सभासदच धूळ चारतील-प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल गुरव यांचे प्रत्युत्तर

(सांगली ) सत्ताधारी पुरोगामी सेवा मंडळाने सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे सभासद हिताचे अनेक निर्णय घेतले.ते सोसत नसल्याने व सभासद हितांचे काही पोटनियम घेतले असल्याने विरोधकांना निवडणुकीस कोणता मुद्दा घेऊन सामोरे जायचे ?हा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे .परंतु तुम्हास यावेळीसुध्दा धूळ चारण्याची व्यवस्था सभासदांच्या साथीने आम्ही केली असल्याची टीका विरोधकांवर सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सुनिल गुरव यांनी केली आहे.सांगली येथे आयोजित सत्ताधारी पुरोगामी सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

ज्यांच्या काळात सर्वाधिक कर्जाचा व्याजदर होता तेच आता व्याजदरावर बोलू लागलेत थोडक्यात सौ चुहे खाँके बिल्ली चली हज को ,अशीच टीकाकारांची अवस्था झाली आहे आणि ज्या अंकलखोपच्याठेवीदारांच्या दिशेने ते बोलत आहेत त्याच ठेवीदारांच्या आशीर्वादाने समितीत प्रवेश करून चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसताना समाधान कसे काय वाटले? याचेही सर्व सभासदांना उत्तर द्यावे .
यापुढे बोलताना चेअरमन सुनिल गुरव म्हणाले की, रिझर्व बँकेने नफा तोटा ताळेबंद जाहीर करा परंतु डिव्हिडंड देणे विषयी कोणतेही मार्गदर्शन केले नसल्याने त्यांच्याकडे व सहकार आयुक्तांकडे डिव्हीडंट देणे विनंती करून सुद्धा अद्याप निर्णय नसलेने व राज्यातील कोणत्याही बँकेने वरील निर्बंधांमुळे कोणालाही डिव्हिडंट दिला नसल्याची माहिती न घेता बेताल आरोप करून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. 
यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसमोर सभासदांच्या हितांचे पोटनियम दुरुस्ती ठेवल्याने त्यांचा एवढा मोठा पोटशूळ का उठावा? शिवाय मासिक कायम ठेवी या सभासदांच्या हक्काच्या रकमा द्यावयाच्या असल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल. मग आपणास राजकारण करताना कोणताही मुद्दा शिल्लक राहणार नाही .याचा धसका विरोधकांनी घेतला आहे.
 डीसीपीएस धारकांच्या संदर्भात पुतना मावशीचे प्रेम कोणाचे आहे .हे डीसीपीएस बांधवांना न कळण्याइतके ते अज्ञानी नाहीत.
यावेळी राज्य नेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, राज्य संघटक सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे, पार्लमेंटरी अध्यक्ष किसनराव पाटील, सचिव शशिकांत भागवत,व्हाईस चेअरमन महादेव माळी ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू,फुले रुग्णालयाचे चेअरमन राजेंद्र कांबळे, तुकाराम गायकवाड ,शशिकांत बजबळे, यु .टी .जाधव, हरिभाऊ गावडे ,बाळासाहेब आडके,सदाशिव पाटील ,रमेश पाटील ,शिवाजीराव पवार, श्रीकांत माळी आदी उपस्थित होते.
To Top