नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय ग्राफलिंग स्पर्धेमध्ये आंधळी येथील हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूलच्या कु.सृष्टी अमर जाधव,कुमकुम वासुदेव कुलकर्णी,वेदांत अमर जाधव,स्वराज शिवाजी जाधव वआयुष विश्वास जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले व त्यांची गोवा येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.
त्यांना क्रीडाशिक्षक मंगेश माने यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक जयवंत मोहिते तसेच सांगली जिल्हा ग्राफलिंग असोसिएशनचे सचिव अमोल कदम यांचे प्रोत्साहन लाभले.त्याबद्दल विजेत्या खेळाडूंचा शिक्षण विस्तार अधिकारी मा.अशोक जाधव यांचे शुभहस्ते सत्कार करणेत आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मा.जाधव साहेब व मुख्याध्यापक मोहिते सर यांनी खेळाडुंना स्वतः बरोबरच आपल्या शाळेचे व जिल्ह्याचे नांव उज्ज्वल करावे असा संदेश देऊन राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.ह्या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील,उपाध्यक्ष विष्णू माने,सचिव नरेंद्र पाटील,नानासाहेब माने व यशवंत माने यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक रमेश गायकवाड तर आभार प्रियांका पाटील यांनी मानले. संयोजन एस.पी.पाटील,आर.एम.खामकर,डी.व्ही.बंडगर,डी.सी.चौधरी,यु.एस.गुरव,एस.एस.कांबळे,आर.आर.पाटील,यु.बी.शिंदे,बी.एच.जाधव,पी.डी. बंगाल व एस.डी.कोळेकर यांनी केले. तसेच अमर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.