Sanvad News १७ मार्च पासून प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरणार;सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा निर्णय

१७ मार्च पासून प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरणार;सांगली जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा निर्णय


वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक,खाजगी प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या सर्व शाळा १७ मार्च २०२१ पासून सकाळ सत्रात भरविण्या बाबत लेखी आदेश सांगली जिल्ह्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. विष्णू कांबळे यांनी दिला आहे.
जा. क्र.प्राशिवि./१७/वशी/१७८१/२०२१प्राथमिक शिक्षण विभाग जि. प.सांगली दिनांक १६/३/२०२१ या पत्राने सदर निर्णय सर्व गटशिक्षणाधिकारी,नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी,सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक यांना कळविण्यात आला आहे.
सन २०२१ या शैक्षणिक वर्षात कोव्हिड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत. वाढत्या उन्हाळ्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून बुधवार दिनांक १७ मार्च पासून जिल्हा परिषद,खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळ सत्रात भरविण्यात येणार आहेत.माध्यमिक शाळा संहिता ५४.२ नमूद केल्याप्रमाणे या शैक्षणिक सत्राच्या अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात ७:३० ते १२:०० या वेळेत शाळा भरविण्यास परवानगी देण्यात येत आहे.
इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून सदर वर्गाच्या सर्व विषयाचे अध्यापनाचे काम शंभर टक्के पूर्ण करणे अनिवार्य आहे.तसेच इयत्ता ५ ते ९ वी व ११ वी च्या परीक्षा शाळास्तरावर घ्यावयाच्या असल्याने या वर्गातील सर्व विषयांचा शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे.यासाठी सकाळच्या सत्रात स्थानिक परिस्थितीस अनुसरून
अध्यापनाच्या कामाचे तास वाढविणेस हरकत नसल्याचे नमूद केले आहे.
वाढता उन्हाळा लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सकाळ सत्रात शाळा सुरू करण्यासाठी घेलेल्या निर्णया बद्दल सांगली जिल्ह्यातील शिक्षक संघटना,पालक व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


To Top