महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सांगली या संघटनेच्या वतीने शिक्षकांची एक सामाजिक बांधिलकी म्हणून,गरजू रुग्णांना अल्पदरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले सहकारी रुग्णालय मर्या.सांगली या संस्थेची स्थापना करण्यात आली.सांगली जिल्ह्यात पहिलेच सहकारी तत्वावरील रुग्णालय उभारण्याचे शिक्षक समितीचे नेते व संस्थेचे संस्थापक विश्वनाथ आन्ना मिरजकर यांचे ध्येय आहे.या कामासाठी शेअर्स च्या रूपातून भाग भांडवल करण्यात येत आहे. समाजातील सर्वच स्तरातून त्यास उसफूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
संस्थेच्या वतीने सन २०२० मध्ये आलेल्या कोरोनाच्या महाभयंकर साथीमध्ये ४० बेडचे कोविड केअर सेंटर उभे केले होते.संस्थेच्या नियोजित रुग्णालयासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे जागा मागणी प्रस्ताव व प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करण्यात आला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी संस्थेने कोरोना कालावधीत केलेल्या कामाची प्रशंसा केली तसेच संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड,राज्य संघटक सयाजी पाटील,चेअरमन राजेंद्र कांबळे,संचालक तुकाराम गायकवाड,शशिकांत बजबळे, पार्लमेंट री सचिव शशिकांत भागवत,सरचिटणीस दयानंद मोरे, यु. टी.जाधव,श्रेणिक चौगुले, श्रीकांत माळी,धरेप्पा कट्टीमनी,श्री.बालगावे(मामा) आदी उपस्थित होते.