शिक्षक बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने,कर्जाचे व्याजदर कमी करून जाहिरनाम्यातील दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी,शिक्षक समितीने शिक्षक बॅंक निवडणूक लढताना सभासद बंधू-भगिनी यांना जाहिरनामा देताना त्यात एक अंकी व्याजदर करू व दोन अंकी लाभांश देऊ,नोकर भरती करणार नाही असे आश्वासन दिले होते सभासद बंधू-भगिनी यांनी विश्वास ठेवून सलग सत्ता दिली परंतु सभासद हिताचा कारभार करण्यात व एक अंकी व्याजदर व दोन अंकी लाभांश वाटप करण्यात सत्ताधारी मंडळी अपयशी ठरले आहेत.तरी त्यांना अजून संधी असल्याने त्यांनी एक अंकी व्याजदर व दोन अंकी लाभांश देऊन आश्वासनांची पूर्तता करावी अन्यथा सभासदांची शुद्ध फसवणूक करणाऱ्या सत्ताधारी मंडळींना येणारी पंचवार्षिक निवडणूक लढविण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे मत जिल्हा कार्यकारिणी सभेत बोलताना शब्बीर तांबोळी अध्यक्ष तासगाव तालुका यांनी व्यक्त केले.
तसेच सध्या शिक्षक बॅंकेतील कर्जाचे व्याजदर हे ११.५० ते १३.५० टक्के पर्यंत असून व ठेवीचे व्याज दर हे ५ ते ६ टक्के पर्यंत आहेत ,ठेव व कर्ज यांच्यातील मार्जिन ६ टक्के पर्यंत असल्याने ९ टक्के दराने कर्जाचे व्याजदर करण्यात काय अडचण नसल्याचे सांगितले सत्ताधारी संचालक मंडळींनी स्वतः निर्णय घेऊन व्याजदर कमी करून संचालक मंडळच कारभार करते आपण नामधारी नाही हे सत्ताधाऱ्यांनी व्याजदर एक अंकी करून सिद्ध करावे.
येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये लाभांश जाहीर केला नसून तो तत्काळ जाहिर करून लाभांश वाटप करावा अशी मागणी यावेळी शब्बीर तांबोळी यांनी केली.आपली बॅंक हि १००% वसूल असणारी बॅंक आहे ती कोरोना काळात पगार चालू असल्याने दिवाळीत खोरीत, थकबाकीत आलेली नसल्याने रितसर परवानगी मागून सर्व सभासदांना लाभांश वाटप जाहिर करावा .सभासद हिताचे निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेचे नियम आड येतात, संचालक मंडळाच्या हिताचे निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेचे नियम कोठे जातात हे न उलगडणारे कोडे आहे असे मत व्यक्त केले.
शिक्षक बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पोटनियमात बदल करून कायम ठेव मागणी न करता देण्याचा जो घाट घातला आहे तो सभासदांची सहानुभूती मिळवण्यासाठी केला जाणारा केविलवाणा प्रयत्न प्रयत्न असून ठेवीला जादा व्याजदर द्यावा लागत असल्याने सत्ताधारी संचालक मंडळाने हा निर्णय घेण्याचा विषय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला असून तो निर्णय न घेता शेअर्स रक्कम पन्नास हजार रकमेवर पर्यंत लॉक करून उर्वरित शेअर्स रक्कम सभासदांना परत करण्यात यावी,कारण सभासदांचे लाखो रुपये शेअर्स रूपात बॅंकेत जमा असून त्यावर तुटपुंज्या स्वरूपात डिव्हीडंट दिला जातो, त्यामुळे हि रक्कम परत केली तर सभासद बंधू-भगिनी यांचा त्यामध्ये फायदा होईल तेवढेच कर्जदार सभासद बंधू-भगिनी यांचे कर्ज कमी होईल किंवा अन्य कारणांसाठी ती रक्कम वापरता येईल.हा निर्णय सभासद बंधू-भगिनी यांच्या हिताचा घ्यावा असे आवाहन शब्बीर तांबोळी यांनी केले.
यावेळी बोलताना सत्ताधारी संचालक मंडळाने गेली अकरा वर्षे सत्ता भोगून देखील सभासद अहिताचा कारभार केला आहे.त्यामुळे सभासदांच्या प्रचंड नाराजी आहे,त्यामुळे सभासद यावेळी निश्चितच परिवर्तन करतील सत्ताधार्यांना घरी बसवतील असा विश्वास व्यक्त केला, तसेच संगणक दुरुस्तीवर अमाप खर्च,शाखा इमारत खरेदीवर वारेमाप खर्च, अनावश्यक नोकरभरती, कर्मचारी बोनस व बक्षीस पगार वाटप अशा विविध बाबींवर केलेला वारेमाप खर्च यामुळे सभासद बंधू-भगिनी यांना कमी व्याजदराने कर्ज देण्यात अपयशी ठरले आहेत, यामुळे सभासद बंधू-भगिनी यांना भरमसाठ व्याज दराने कर्ज घेऊन ते फेडण्यातच त्यांचा पगार खर्ची पडत आहे.त्यामळे सभासद बंधू-भगिनी यांची सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रचंड नाराजी असल्याने परिवर्तन अटळ आहे असे शब्बीर तांबोळी यांनी सांगितले.
यावेळी अविनाश गुरव , श्रीकांत पवार, नंदकुमार खराडे,रघूनाथ थोरात, अण्णासाहेब गायकवाड, राजाराम कदम, उत्तम पाटील,आनंदा उतळे, संदिप खंडागळे, संदिप पाटील, जगन्नाथ घोडके,संभाजी पाटील ,मारूती मोरडे , मलकुद्दीन मुल्ला, सुधीर नलवडे,संजय शिंदे, पंडित पाटील, इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.