Sanvad News सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या कर्जावरील व्याजदरात अर्धा ते साडे तीन टक्क्यांपर्यंत कपात;पुरोगामी मंडळाचा गुरुजांना सुखद धक्का

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या कर्जावरील व्याजदरात अर्धा ते साडे तीन टक्क्यांपर्यंत कपात;पुरोगामी मंडळाचा गुरुजांना सुखद धक्का


सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्व कर्जदार सभासदांना सर्व कर्जावरील व्याजदरात अर्धा टक्क्यापासून साडेतीन टक्के पर्यंत भरघोस कपात केली आहे.  शिक्षक समितीच्या पुरोगामी सेवा मंडळाने रविवारी होणाऱ्या ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वसंध्येला गुरुजन मंडळीना सुखद धक्का दिला आहे.या पंचवार्षिक मध्ये पाचव्यांदा कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असल्याचा दावा करीत शिक्षक समितीच्या जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आनंदोत्सव साजरा केला आहे.
 शिक्षक बँकेने घोषित केलेल्या सदर व्याजदर कपातीचा लाभ सभासदांना दिनांक 1 एप्रिल 2021 पासून मिळणार आहे. कर्ज प्रकार व व्याजदरातील केलेली कपात पुढील प्रमाणे आहे.
1.सभासदसेवकस्पेशलकर्ज(जामिनकी)-13%चे12%
2. सभासद /सेवक स्पेशल कर्ज-13%चे12%
3. सभासद /सेवक जामिनकी कर्ज- 13.5%चे13%
4. सेवानिवृत जामिनकी कर्ज- 13 चे12% 
5.सभासद/सेवकजामीनकीनंबर2 कर्ज-11.5%चे11%
6.सभासद /सेवक घर दुरुस्ती कर्ज- 13.5%चे12.5%
7. सभासद /सेवकघर बांधणी कर्ज-12.5%चे11.5%
8. हायर परचेस कर्ज- 9%
9. वाहन तारण कर्ज-9%
10.सभासद अधिवेशन कर्ज- 13.5%चे10%
11.नाममात्र शिक्षण सेवक कर्ज- 13.5%चे10%
12.शैक्षणिक कर्ज-12.5%चे9%
13.संगणक खरेदी कर्ज- 12.5%चे9%


 100% सभासदांना 100%  न्याय देण्यासाठी हा ऐतिहासिक व धाडसी निर्णय सत्ताधारी संचालक मंडळाने घेतला असून शिक्षण सेवकांसाठी बंपर धमाका भरघोस साडेतीन टक्के ची कर्ज व्याजदरात कपात करून नव्या दमाच्या शिक्षकांनाही आपल्या शिक्षक बँकेने मोठा आधार व दिलासा देण्याचे काम केले आहे.
 यावेळी राज्य नेते विश्वनाथ ( अण्णा ) मिरजकर ,माजी राज्यकोषाध्यक्ष किरणराव गायकवाड ,राज्य संघटक सयाजीराव पाटील,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड ,सरचिटणीस दयानंद मोरे,पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील ,सचिव शशिकांत भागवत,चेअरमन सुनिलराव गुरव ,व्हाईस चेअरमन महादेव माळी , मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाो कोले ,मनपा नेते  म .ज.पाटील, शिक्षक नेते विष्णुपंत रोकडे ,माजी चेअरमन तुकाराम गायकवाड ,शशिकांत बजबळे, श्रीकांत माळी ,यु. टी. जाधव, सदाशिव पाटील शिवाजीराव पवार ,रमेश पाटील ,बाळासाहेब आडके श्रेणिक चौगुले , हरिभाऊ गावडे  ,राजाराम सावंत,मनपा नेते  म .ज.पाटील, शिक्षक नेते विष्णुपंत रोकडे , तासगाव तालुकाध्यक्ष श्रीकांत शिंदे, शिक्षण सेवक धडाडीचे नेते ज्ञानेश्वर साबळे आदी  उपस्थित होते.
To Top