आज सत्ताधारी संचालक मंडळाने भरघोस व्याजदर कपात करून सभासदांना सुखद धक्का दिला असे सांगून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा जो प्रकार केला आहे तो योग्य नसून हि एक प्रकारची सभासद बंधू-भगिनी यांची शुद्ध फसवणूक असल्याचा आरोप शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष शब्बीर तांबोळी यांनी केला आहे.
मुळात जे कर्ज सभासद बंधू-भगिनी यांनी जास्त प्रमाणात घेतले आहे त्याचे नाममात्र ०.५०% ते १ टक्का व्याजदर कमी केला आहे.मात्र प्रसिद्धी साठी जे कर्जे सभासद बंधू-भगिनी यांनी अत्यल्प प्रमाणात घेतली आहेत किंवा काही कर्जे अशी आहेत की ते सभासदांनी घेतलेली नाहीत अशा कर्जांचा व्याजदर ३.५० टक्के कमी करून यात किती टक्के सभासद बंधू-भगिनी यांना लाभ मिळणार आहे याचे संशोधनच करावे लागेल.
वास्तविक पाहता जी कर्जे सभासद बंधू-भगिनी यांनी जास्त प्रमाणात घेतली आहेत त्या कर्जांचा व्याजदर एक अंकी होणे गरजेचे होते तशी सर्व कर्जदार सभासद बंधू-भगिनी यांची मागणी आहे व सत्ताधारी संचालक मंडळाने आपल्या जाहिरनामा निवडणूक लढताना जाहिर करताना एक अंकी व्याजदर करू, नोकर भरती करणार नाही, दोन अंकी लाभांश देऊ असे आश्वासन दिले होते सभासद बंधू-भगिनी यांनी विश्वास ठेवून सलग दहा ते अकरा वर्षे सत्ता दिली असताना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात सत्ताधारी संचालक मंडळ अपयशी ठरले आहे, त्यामुळे यावेळी परिवर्तन अटळ आहे असे मत बोलताना शब्बीर तांबोळी अध्यक्ष तासगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ तासगाव यांनी व्यक्त केले.
त्यांनी यावेळी बोलताना सांगितले की आपण स्वतः तासगाव, सावळज,भिलवडी या शाखेत कोणती कर्जे सभासद बंधू-भगिनी यांनी जास्त प्रमाणात घेतली आहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी स्पेशल कर्ज ज्याचे व्याज दर एक टक्का कमी केले आहे, त्यानंतर जामिनकी कर्ज ज्याचे व्याज दर ०.५०टक्के म्हणजेच अर्धा टक्का कमी केले आहे, त्यानंतर जामिनकी कर्ज नं.२ ज्याचे व्याज दर०.५०टक्के म्हणजेच अर्धा टक्का कमी केले आहे, म्हणजेच मुळातच जी कर्जे मोठ्या प्रमाणावर सभासद बंधू-भगिनी यांनी घेतली आहेत त्याचा व्याजदर अर्धा ते एक टक्का कमी केला तो व्याजदर एक अंकी करणे शक्य होते कारण कर्जाचे व्याज दर व ठेवीचे व्याज दर यामध्ये ५ ते ६ टक्केची तफावत असल्याने एक अंकी व्याजदर करणे शक्य असताना फक्त सभासद हिताची मानसिकता नसल्याने करू शकले नाहीत.त्यानंतर घरबांधणी, हायरपरचेस, वाहनतारण, अधिवेशन, शिक्षणसेवक, शैक्षणिक कर्ज,संगणक कर्ज यातील काही कर्जे कोणीही घेतली नसल्याचे व घरबांधणी सारखे नाममात्र सभासदांचे कर्ज असेल अशी माहिती मिळाली आहे,मग अशा कर्जाचे व्याज दर ३.५० टक्के कमी करून किती टक्के सभासद बंधू-भगिनी यांना दिलासा मिळाला याबाबत सत्ताधारी संचालक मंडळाने अभ्यास करून आपण सभासद बंधू-भगिनी यांची शुद्ध फसवणूक करत आहोत याची जाणीव ठेवावी, ज्या विश्वासाने सत्ता दिली होती त्या विश्वासाला तडा गेला आहे. त्यामुळे समोर आता शिक्षक बॅंकेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ०.५० टक्के व्याजदरा कमी करणार याची पूर्व कल्पना सर्व सभासद बंधू-भगिनी यांना होती तरीही सभासद बंधू-भगिनी यांची सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. सभासद बंधू-भगिनी सुज्ञ असल्याने निश्चितच यावेळी परिवर्तन घडवून सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या हातात सत्ता देतील यात तिळमात्र शंका नाही, असे सांगून सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सत्ता येताच संचालक मंडळाच्या पहिल्या मिटींगमध्ये पंधरा लाख रुपयांचे कर्ज ९टक्के दराने विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देणार असल्याचे सांगितले.
यावेळी अविनाश गुरव , श्रीकांत पवार, नंदकुमार खराडे,रघूनाथ थोरात, अण्णासाहेब गायकवाड, राजाराम कदम, उत्तम पाटील,आनंदा उतळे, संदिप खंडागळे, संदिप पाटील, जगन्नाथ घोडके,संभाजी पाटील ,मारूती मोरडे , मलकुद्दीन मुल्ला, सुधीर नलवडे,संजय शिंदे, पंडित पाटील, इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.