पंडित विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयात पतंगासाठी नायलॉन दोरा ( मांजा) न वापरणे बाबत शपथ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.जे.करांडे सर ,जेष्टशिक्षकए.जे.सावंत,बी.एन.पोतदार,जी.एस.पाटील,एस.डी.सावंत,एस.एस.पुदाले,व्ही.पी.कांबळे,सौ.नरुलेमँडम,सौ.टी.पी.पाटील ,प्राथमिक विद्यालयातील जे.बी.पाटील ,सर्व शिक्षक ,शिक्षिका ,विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख बी.डी. चोपडे यांनी सर्व शिक्षकांना,विद्यार्थ्यांना शपथ दिली.
यावेळी मुख्याध्यापक टी.जे करांडे सर यांनी विद्यार्थ्यांना पतंगासाठी नायलॉन दोरा न वापरण्याबाबत आवाहन केले व नायलॉन दोरा वापरल्यानंतर होणारे दुष्परिणाम सांगितले.
निसर्गाशी असलेली कटिबद्धता निश्चित करण्यासाठी,पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी शपथ घ्यावी, विद्यार्थ्यांना प्रबोधन करावे असे आवाहन पलूसचे पोलीस निरीक्षक विकास जाधव व पोलिस ठाणे यांच्या वतीने करण्यात आले होते .सर्व विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.