श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल येथे जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात आला.
आपल्या पर्यावरणातलं आणि निसर्गचक्रातील चिमणीचं अनन्यसाधारण स्थान आहे. चिमणी या छोट्या पक्षांकडून शेतपीकांमधील अनेक कीटकांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यांचे संरक्षण करणे ही आज काळाची गरज आहे. अन्नधान्यावरील कीटकांचा बंदोबस्त करणारी ही चिमणी वृक्षतोड, ओद्योगीकरण,प्रदूषण व कीटकनाशकांच्या अनिर्बंध वापरामळे दृष्टीआड होऊ लागलीय. ही परिस्थिती आपण बदलण्याची गरज आहे. त्यासाठी जनजागृतीद्वारे आपण सामुहिक पातळीवर प्रयत्न केल्यास चिमणी संवर्धन शक्य आहे." असे जागतिक चिमणी दिन प्रसंगी बोलताना विठ्ठल मोहिते म्हणाले.
याप्रसंगी 'एक भारत श्रेष्ठ भारत' या अभियानांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडल्या. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप पवार हे होते. स्वागत सुनिल खोत यांनी तर,प्रास्ताविक राजाराम वावरे यांनी केले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे परीक्षण सुहास कोळी यांनी तर आभार बी.व्ही.शिंदे यांनी मानले.
याप्रसंगी रमेश अहिरे, ऐ.बी.पटेल, सुवर्णा गायकवाड व विद्यार्थी उपस्थित होते.