भिलवडी शिक्षण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे अध्यक्षस्थानी होते.
स्वागत व प्रास्तविक सचिव एस.एन.कुलकर्णी यांनी केले.मागील सभेच्या इतिवृत्त्ताचे वाचन केले.अहवाल सालातील सर्व जमा-खर्चास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. सभासदांनी लेखी विचारलेल्या विविध प्रश्नांना संस्था पदाधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली.
यावेळी बोलताना विश्वास चितळे म्हणाले की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा आॕनलाईन घेतली आहे. इयत्ता ५वी ते १२वीचे वर्ग नियमीतपणे सुरु आहेत. कोरोना कालावधीत संस्थेच्या सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट पद्धतीने ऑनलाईन शिक्षणाचे कामकाज केले आहे.याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
प्रा.आर. डी. पाटील यांनी आभार मानले. संस्थेचे उपाध्यक्ष डाॕ.बाळासाहेबचोपडे,विश्वस्त नानासाहेब चितळे,जे.बी.चौगुले, सुहासजोशी,वसर्वसंचालक विभागप्रमुख, मुख्याध्यापक,प्राचार्य उपस्थित होते.