Sanvad News श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये जागतिक वनदिन व जल दिनानिमित्त बांबू लागवड

श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलमध्ये जागतिक वनदिन व जल दिनानिमित्त बांबू लागवड

     
"माझी माय कृष्णा" या लोकचळवळी अंतर्गत कृष्णा नदीकाठी श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूलच्या वतीने जागतिक वनदिन व जल दिनानिमित्त हरीपूर ता.मिरज येथील कृष्णानदी काठी  बांबू लागवड करण्यात आली.
   युवानेते अरविंद तांबवेकर, परिमंडळ वन अधिकारी राजेंद्र घुणकीकर व वनरक्षक शितल मांगले ,'माझी माय कृष्णा' चळवळीचे समन्वयक सलील लिमये , सतिश खंडागळे ,जयसिंग कुंभार, आकाराम कारंडे, मुख्याध्यापक दिलीप पवार यांचे हस्ते बांबू लागवड करण्यात आली . 
   याप्रसंगी 'माझी माय कृष्णा' या लोकचळीबद्दल बोलताना सलील लिमये म्हणाले की, "आपण नदी,पाणी,जमीन,पर्यावरण,वृक्षारोपण  या बाबतीत अधिक सजग होण्याची गरज आहे. ही चळवळ उत्सुफूर्त लोकसहभागातूनच अधिक यशस्वी होणार आहे. यासाठी मळीकाठच्या शेतकऱ्यांबरोबरच अन्य समाजघटकांनीही चळवळीचा एक भाग व्हावा."
  परिमंडळ वन अधिकारी राजेंद्र घुणकीकर म्हणाले,"पुस्तकातील पर्यावरण हा विषय आपल्या मस्तकात  जावा आणि त्याच्या संवर्धनासाठी कृतीशील राहावे. आपल्या जगण्याशी त्याचं अतुट नातं आहे. निसर्गाशी मैत्री करून  आपण निसर्गासवे जगावे" 
    स्वागत मुख्याध्यापक दिलीप पवार यांनी केले.  प्रास्ताविक विठ्ठल मोहिते यांनी  तर आभार राजाराम वावरे यांनी मानले.याप्रसंगी सुवर्णा गायकवाड, राजकुमार हेरले, ग्रामस्थ,  शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल, हरीपूर   "राष्ट्रीय हरित सेना" व हरीपूर ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांचे वतीने  संयोजन करण्यात आले.
To Top