Sanvad News प्राथमिक शिक्षकांना लवकरच पदोन्नती - शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे;शिक्षक समितीस आश्वासन.

प्राथमिक शिक्षकांना लवकरच पदोन्नती - शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे;शिक्षक समितीस आश्वासन.

 

प्राथमिक शिक्षकांना शिक्षकांना पदोन्नती देण्यात येणार असल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी विष्णू लोखंडे यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळास सांगितले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते किरणराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड ,राज्य संघटक सयाजीराव पाटील, शशिकांत भागवत, शिक्षक बँकेचे चेअरमन सनिल गुरव आदींनी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.विष्णू कांबळे साहेब यांचे स्वागत उपशिक्षणाधिकारी श्री.महेश धोत्रे साहेब यांच्या उपस्थितकरण्यातआले.
यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.विष्णू कांबळे साहेब म्हणालेकी, पंचायत समिती कडे प्राथमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तपासणीकरिता पाठविली असून ती तालुकास्तरावरुन चार दिवसांत तपासणी करुन पाठवण्याची सूचना दिली आहे. सेवाजेष्टतेच्या निकषांवर शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ देण्यात येईल तसेच उर्वरित प्रलंबित प्रश्नही सोडविणार असल्याचे सांगितले.
           यावेळी जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे, कार्याध्यक्ष सतिश पाटील, शिक्षक बँकेचे व्हा.चेअरमन महादेव माळी, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, बाळासाहेब आडके, श्रेणिक चौगुले, सदाशिव पाटील, हरीभाऊ गावडे,रमेश पाटील, म.ज.पाटील, कांतेश सन्नोली, सयाजी बंडगर आदी शिक्षक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
To Top