शिक्षण विभागातील पेंडन्सी कमी करून शिक्षकांची रखडलेली कामे वेळेत करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी श्री.विष्णू कांबळे यांनी शिक्षक संघाला दिले.
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा चार्ज स्वीकारल्याबद्दल श्री. कांबळे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
शिक्षक संघाच्या वतीने विविध समस्यांची मांडणी केली असता इथून पुढे शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर फायलींचा ढिगारा दिसणार नाही अशी टिप्पणीही कांबळे यांनी केली. तसेच प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत देण्याबरोबरच विषय शिक्षकांची वेतनश्रेणी, विषय शिक्षकांची पदावनती या सारख्या महत्वाच्या विषयांवर हे ठोस निर्णय घेतला जाईल. तसेच विस्ताराधिकारी व वरिष्ठ मुख्याध्यापक पदाची पदोन्नतीची प्रक्रिया या महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल.
यावेळी उपशिक्षणाधिकारी श्री महेश धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, अरुण पाटील, संजीवनी जाधव, मुरलीधर दोडके, संतोष जगताप, शब्बीर तांबोळी, तानाजी कोडग, धनाजी घाडगे, शिवरुद्र वठारे यांच्यासह शिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.