Sanvad News कोरोना योद्धा शिक्षकांना तात्काळ बेड उपलब्ध होण्याकरिता जिल्हा समन्वयकाची नियुक्ती करा - शिक्षक संघाची ई मेल द्वारे सीईओंना मागणी

कोरोना योद्धा शिक्षकांना तात्काळ बेड उपलब्ध होण्याकरिता जिल्हा समन्वयकाची नियुक्ती करा - शिक्षक संघाची ई मेल द्वारे सीईओंना मागणी


सध्या कोरोना महामारीची दुसरी लाट प्रकर्षाने निर्माण होत असून सदर महामारी चा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कार्यात अनेक प्राथमिक शिक्षक वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार  कोविड आयसोलेशन कक्ष, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोविड कॉल सेंटर, कोविड लसीकरण केंद्र, चेक पोस्ट या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहेत. सदर शिक्षक किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती कोरोना बाधित झाली तर तात्काळ त्यांना बेड किंवा अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर एक स्वतंत्र जिल्हा समन्वयकाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
              कोरोना संसर्ग रोखण्यासाठी  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या यशस्वी नियोजनामुळे कोरोना संसर्ग रोखणे शक्य होत आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कार्य बजावत असताना शिक्षक किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.अशावेळी कोरोना योद्धा शिक्षक किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना बेड व तत्सम अत्यावश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध होणे आवश्यक आहे.


  कोरोना प्रादुर्भाव साथरोग कालावधीमध्ये विविध व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना कोरोना साथ रोगाचा संसर्ग झाल्यास अशा कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार बेडची उपलब्धता करून देण्याकरिता मागील वर्षी  जिल्हा परिषद स्तरावर एक स्वतंत्र जिल्हा समन्वयक नियुक्त करण्यात आले होते.याचा फायदा अनेक कोरोना  योद्धा शिक्षकांना झाला होता. गत वर्षी प्रमाणे यावेळीही कोरोना योद्धा असणारे बाधित शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तात्काळ बेड व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र जिल्हा समन्वयकांची पुनर्नियुक्ती करावी अशा मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ई-मेल द्वारे देण्यात आले. त्याची प्रत जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे ,शिक्षण सभापती आशाताई पाटील व शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांना ही पाठवण्यात आली आहे.
            या निवेदनावर अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील ,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अमोल माने, जिल्हा सरचिटणीस राहुल पाटणे यांच्यासह अन्य पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
To Top