Sanvad News प्रकाश प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत देसाई-देशमुख हिंदी सर्टिफिकेट कोर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

प्रकाश प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीकांत देसाई-देशमुख हिंदी सर्टिफिकेट कोर्स परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण


इस्लामपूर येथील प्रकाश प्राथमिक विद्यालय (सेमी इंग्रजी माध्यम) चे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत देसाई-देशमुख यांनी हिंदी सर्टिफिकेट कोर्स परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवले.
सदरची परीक्षा केंद्रीय हिंदी निदेशालय नवी दिल्ली मार्फत राबविण्यात येते. सदरच्या परीक्षेत सरांनी 250 पैकी 225 गुण मिळवून हे यश प्राप्त केले. 
    सरांनी मागील वर्षी ही केंद्रीय हिंदी निदेशालय, नवी दिल्ली मार्फत राबविण्यात आलेल्या हिंदी डिप्लोमा कोर्स परीक्षेत 400 पैकी 333 गुण मिळवून विशेष प्रावीण्य मिळवले होते. या यशाबद्दल सरांना केंद्रीय हिंदी निदेशालय तर्फे विशेष भेट देऊन गौरविण्यात आले होते.सर गेली 14 वर्षे विद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन कार्य करत आहेत.  
त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या प्रशासिका सौ.सुनिता निशिकांतभोसले-पाटील (वहिनी),प्रकाश पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.मधुकुमार नायर सर व प्रकाश माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सिंधू नायर मॅडम यांनी विशेष अभिनंदन केले.
To Top