भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. covid-19 अंतर्गत सर्व खबरदारी घेऊन आणि सोशल डिस्टंसिंग च्या नियमावलीचे पालन करून महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांनी योग दिन वेगवेगळी आसने करून साजरा केला. सदर कार्यक्रमास राज्य पातळीवरील व्हॉलीबॉल आणि कबड्डी खेळाडू श्री संदीप नलवडे यांनी मार्गदर्शन केले . सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉ.दीपक देशपांडे , डॉ. विजयगाडे,डॉ. डी पी खराडे,डॉ. व्ही.एस.विनोदकर ,श्री एस एन. खोत , विज्ञान विभाग प्रमुख श्री. दिग्विजय मोकाशी,श्री सतीश पोतदार, सौ एस. आर.कुलकर्णी, श्री. सुरेश धोत्रे,श्री. संतोष गायकवाड आदी उपस्थित होते.