Sanvad News पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न.

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न.


पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साही वातावरणात  साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे, सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक  टी.जे.करांडे यांच्या  मार्गदर्शनाखाली विद्यालयातील सर्व  शिक्षक व विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला.
 पूरक हालचाली ,ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन अर्धचक्रासन, त्रिकोणासन, मद्रासन, सशांकासान, वक्रासन, भुजंगासन आदी विविध योगाची आसने व व्यायाम प्रकार, प्राणायाम त्यांचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापकटी.जे.करांडे  ,योगशिक्षक व्ही. एस. गुरव यांनी योगाचे महत्त्व विविध उदाहरणांने सांगितले .क्रीडाशिक्षक एस.डी.सावंत  यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले.       
 यावेळी टी.जे.करांडे म्हणाले योग हा इव्हेंट नसून जीवनाचे मँनेजमेंट आहे . योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी आजपासून नियमितपणे योगा करूया.योग, विज्ञानाची कास धरू,, कोरोनावर मात करू असे सांगितले  क्रीडा शिक्षक संदीप सावंत म्हणाले विद्यार्थी जीवनामध्ये योगाचे खूप महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी नेहमीच योगा केल्यास विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता निश्चित वाढीस लागेल.


योग शिक्षक  विकास गुरव  म्हणाले योग सुखी समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली आहे .योग आपल्या हाती नको कोरोनाची भीती, योग करा आणि निरोगी रहा असे सांगितले.
प्रास्ताविक एस. एस. पुदाले यांनी आभार बी.एन.पोतदार यांनी मानले.. संयोजन एस.पी. मेंगाणे सर,ए.एस.चव्हाण,एस.आर.शिकलगार,विकास कांबळे सर्व शिक्षक,शिक्षिका  यांनी केले.यावेळी ज्येष्ठ शिक्षक ए.जे.सावंत, ए.के.बामणे, सौ.अलका बागल ,सौ. प्रिती नरुले, जी.एस.पाटील एम.जे.शिरतोडे,सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
To Top