छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने तासगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिक्षक बॅंकेच्या भ्रष्ट कारभाराविरूद्ध 'साष्टांग नमस्कार ,विनंती विशेष'या अभिनव आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
या आंदोलनाच्या माध्यमातून शिक्षक सभासदांच्या भावना भ्रष्ट सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे मा.अविनाश गुरव यांनी सांगितले तसेच त्यांनी या कोरोनाच्या काळात देखील ६२ लाख रुपये कर्मचाऱ्यांना बक्षिस पगार म्हणून वाटप करण्याचा घाट सत्ताधारी मंडळीने घातल्याचा सांगितले हेच पैसे कर्मचाऱ्यांना बक्षिस पगार न देता सभासदांना डिव्हीडंड वाढवून द्यावा अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
तसेच नंदकुमार खराडे यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व सभासद बंधू-भगिनी यांच्या पर्यंत पोहचून भ्रष्ट कारभाराला वाचा फोडणार असल्याचे सांगितले.
यावेळी तालुका अध्यक्ष शब्बीर तांबोळी यांनी तालुक्यातून सर्व सभासदांच्या भावना या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे सांगितले.तसेच यावेळी बोलताना त्यांनी या कोरोना काळात ६% दराने 10लाख रूपये कर्ज मिळावे, सर्व कर्जाचे व्याजदर एक अंकी कर्ज करावे अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस अविनाश गुरव, तालुका नेते नंदकुमार खराडे, तालुकाध्यक्ष शब्बीर तांबोळी,महादेव सागरे, अनिल म्हेत्रे,जयंत नाईक, राजाराम भस्मे, शिवाजी मलमे, श्रीकांत शिंदे, सरफराज मुल्ला उपस्थित होते.