पलूस-आंधळी येथील श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकलखोप संचलित, हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल,आंधळीची विद्यार्थीनी कु.प्रज्ञा दिपक सावंत हिने ऑनलाईन राज्यस्तरीय गायन स्पर्धेत 'महाराष्ट्राची सुपर गायिका' होण्याचा बहुमान पटकाविला.
माझी शाळा शैक्षणिक वाहिनी,माईंड लाईट न्यूज चॅनेल यांचेमार्फत ऑनलाईन गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय खुल्या गायन स्पर्धेमध्ये राज्यभरातून सुमारे102 स्पर्धकांनी भाग घेतला.तिला संगीत शिक्षक व मुख्याध्यापक जयवंत मोहिते व दिपक सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष विष्णु माने,सचिव नरेंद्र पाटील, संचालक नानासो माने,यशवंत माने यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक आर.आर.गायकवाड तर आभार एम.एन.माने यांनी मानले. तसेच संयोजन व नियोजन ए.ए.पाटील,यु.एस.गुरव,डी.सी.चौधरीडी.व्ही.बंडगर,आर.एम.खामकर,आर.आर.पाटील,पी.पी.पाटील,एस.पी.पाटील,एस.एस.कांबळे,यु.बी.शिंदे,बी.एच.जाधव,पी.डी.बंगाल,एस.डी.कोळेकर आदींनी केले.