भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या नियोजनानुसार सेतू अभ्यासक्रमास (ब्रीज कोर्स) प्रारंभ करण्यात आला.
इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्व तुकडी मधील विद्यार्थी व पालकांशी शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला.
विद्यालयाचे मुख्याध्यपक सुकुमार किणीकर यांनी १ जुलै ते १४ ऑगस्ट २०२१ या ४५ दिवसाच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सेतू अभ्यासक्रमाच्या ध्येय धोरणा विषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले.शरद जाधव यांनी सेतू अभ्यासक्रमा तील कृतीपत्रिका कशा सोडवायच्या याबद्दल प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.अर्चना येसुगडे यांनी गणित तर पूजा गुरव यांनी इंग्रजी विषयाच्या सरावा बद्दल मार्गदर्शन केले.शिक्षक व पालक व पालक असा ऑनलाईन संवाद साधून शासनाने निर्धारित केलेल्या साधन तंत्राचा उपयोग करून सेतू अभ्यासक्रमास (ब्रीज कोर्स)प्रारंभ झाला.
यावेळी सौ.छायाताई गायकवाड, संध्याराणी भिंगारदिवे,संजय पाटील,विठ्ठल खुटाण,सौ.प्रगती भोसले, वर्षा कोळी आदी शिक्षकांसह इयत्ता ४ थी च्या वर्गातील विद्यार्थी,पालक उपस्थित होते.