पर्यावरणाचा समतोल टिकविण्यासाठी वृक्षारोपण चळवळ गरजेची आहे.राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून त्यांच्या मित्रमंडळींनी सामाजिक भान जपले असल्याचे प्रतिपादन विश्वास चितळे यांनी केले.राजूदादा पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्ताने गिरीश चितळे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के.किणीकर,जयंत केळकर,संजय कदम,माजी संचालक संपत पाटील,माजी सरपंच शहाजी गुरव,बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी च्या मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार,मानसिंग हाके,प्रा.सौ.मनिषा पाटील,खाजगी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, डॉ.प्रकाश गोसावी बालवाडी मुख्याध्यापिका सौ.सुचेता कुलकर्णी,पत्रकार घनःश्याम मोरे आदीसह भिलवडी शिक्षण संकुलातील सर्व विभागप्रमुख,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविक संस्था सचिव संजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन प्रा.एम.आर.पाटील यांनी तर आभार डॉ.श्रीकांत चव्हाण यांनी मानले.राजूदादा पाटील मित्र मंडळाचेशशिकांत माने,सचिन पाटील,संजय येसुगडे,शशिकांत यादव,प्रवीण पाटील,प्रकाश यादव,चंद्रकांत पाटील आदींनी संयोजन केले.